29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रसरकार कधी पडणार हे अजित पवारांना माहीत - चंद्रकांत पाटील

सरकार कधी पडणार हे अजित पवारांना माहीत – चंद्रकांत पाटील

एकमत ऑनलाईन

मुबंई : राज्यात सत्ताबदल अटळ आहे, तो कसा होणार आणि कधी होणार हे अजित पवार यांना माहीत आहे, असे धक्कादायक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. एका खासगी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

अजित पवार ज्या पद्धतीने बोलत आहेत ते पाहता ही निवडणूक त्यांच्या हातातून गेली आहे, असे दिसते. ते ज्या लोकांना भेटत आहेत ते कमी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे जीभेवरचा ताबा सुटला आहे, अशी टीकाही त्­यांनी केली. अजित पवार अलिकडच्या काळात जोरात आहेत. त्यांना काय झालंय माहीत नाही, सौ चुहे खाकर बिल्ली चली हाज को ही म्हण त्यांना चपखल लागू पडते, असा टोलाही त्­यांनी लगावला.

अजित पवार इतके छातीठोक कसे काय बोलतात यावर मी आता अभ्यास करणार आहे. त्यावर एमफील करण्याचाही विचार आहे. शरद पवार यांच्यावरील माझी पीएचडी अजून पूर्ण व्हायची आहे तरीही हा अभ्यास मी करणार. अजित पवार यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेताता, पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, म्हणजे सत्य बाहेर येईल, असेही त्­यांनी सांगितले.

इतके सगळे असूनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारच उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री, उद्या समजा कम्युनिस्टांचे राज्य आले तरी हेच उपमुख्यमंत्री असतील. कम्युनिष्टांचे राज्य येणार नाही हा भाग वेगळा. त्यामुळे अजित पवार जास्त गमजा मारु नका. कालचक्र नेहमी फिरत असते. माणसाने नेहमी नम्र राहून नीट बोलायचे असते. सरकार स्थिर असेल तर इतका आकांडतांडव कशासाठी? एखाद्याला आजार झाला नसेल तर त्यांना आजार झाला नाही म्हणण्याचं कारण नाही. तुम्हाला ते पडणार आहे याची जाणीव आहे. कधी आणि कसे पडणार हेही तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही खोटा आव आणता, अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

तुमच्या मुलांची शॉर्टफॉर्म सुरु करावी लागतील
चंपा म्हणण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रकांत पाटील यांनी इशारा दिला होता.त्याबाबत ते म्हणाले, खूप दिवस मला चंपा म्हणणे त्यांच्या लोकांनी थांबवले होते. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असं सांगितले होते़ आता हे थांबलं नाही तर त्यांच्या मुलांची शॉर्टफॉर्म मला जगाला सांगावे लागेल, असा इशाराही त्­यांनी दिला.

राज्यातील तुरूंगात कोरोनाचं थैमान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या