29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रनोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक

नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक

एकमत ऑनलाईन

नगर : सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तर दुसरीकडे देशात कोरोनाचा सर्वाधिक फटकाही महाराष्ट्राला बसला आहे. असे असले तरी राज्याचे अर्थचक्र सुरू करण्यासाठी लॉकडाऊननंतर अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थिती सुधारत गेल्यास येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

आरोग्यमंत्री शनिवारी नगर दौ-यावर आले होते. त्यावेळी त्यांनी तसे संकेत दिले. राज्यात आता लॉकडाऊनचा विषय राहिला. मात्र, कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता काळजी घेणे गरजेचे आहे. त्यातच कोरोनावर अद्याप लस आलेली नाही. त्यामुळे आपल्याला कोरोनासोबतच जगावे लागणार आहे, असेही टोपे म्हणाले. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील काही दिवसांत राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येणार आहेत.
तसेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करू, असे त्यांनी सांगितले.

मंदिर प्रवेशासाठी भाजपाचे आंदोलन
बीयरबार व दारूची दुकाने उघडायला परवानगी देणारे राज्य सरकार मंदिर प्रवेशाबाबत मात्र निर्णय घ्यायला तयार नाही. मंदिर प्रवेश बंदी तसेच राज्­यातील महिला अत्­याचार या या दोन विषयांवर भाजपाच्या वतीने राज्­यभरात १२ आणि १३ ऑक्­टोबर रोजी आंदोलन करण्यात येणार असल्­याची माहिती भाजपाचे मुख्य प्रदेश प्रवक्­ते केशव उपाध्ये व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे तथा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिली.

६१ महिलांचा आत्मदहनाचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या