19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्रसमीर वानखेडेंवरील सर्व आरोप चुकीचे, कारवाईमुळे बडे लोक दुखावलेत; पत्नी क्रांती रेडकर...

समीर वानखेडेंवरील सर्व आरोप चुकीचे, कारवाईमुळे बडे लोक दुखावलेत; पत्नी क्रांती रेडकर यांचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. वानखेडे यांनी केलेल्या कारवायांमुळे काही बड्या लोकांचे हितसंबंध दुखावले असल्याने त्यांना या पदावरून हटवण्यासाठी आरोपाची राळ उडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

नवाब मलिक रोज नवनवे आरोप करत असल्याने क्रांती रेडकर व समीर वानखेडे यांच्या भगिनी यास्मिन वानखेडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन याला प्रत्त्युत्तर दिले. समीर वानखेडे सत्याच्या मार्गानं काम करतात व त्याचाच काही लोकांना त्रास होतो. समीर वानखेडे यांनी काही चुकीचे केले असेल तर केवळ ट्विटरवर आरोप न करता कोर्टात जावे, असे आव्हान त्यांनी दिले. या प्रकरणातून समीर वानखेडे नक्की बाहेर येतील. नेहमी सत्याचाच विजय होतो, यावर आपला विश्वास आहे. मात्र आम्हाला ज्या पद्धतीने सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे, आक्षेपार्ह भाषेत वक्तवे केली जातात, धमक्या दिल्यात जातात त्याचा त्रास होतो, असे क्रांती रेडकर यांनी सांगितले.

समीर वानखेडे यांच्या भगिनी यास्मिन वानखेडे यांनीही नवाब मलिकांचे आरोप फेटाळून लावले. पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं, ट्वीट करुन लोकांचा वेळ वाया कशाला घालवता? असे आव्हान त्यांनी दिले. आमचे कुटुंब तपासासाठी तयार आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. कोणतीही चौकशी झाली तरी आम्हाला भीती नाही, असे यास्मिन वानखेडे यांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबाला सध्या मीडिया ट्रायलला सामोरे जावे लागत आहे. आमचा काहीही दोष नसताना याची उत्तर आम्हाला द्यावी लागत असल्याची खंत यास्मिन वानखेडे यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या