सातारा : मनाली येथे ट्रेकिंगचे ट्रेनिंग घेणासाठी गेलेल्या ट्रेकर्स बसला अपघात झालेल्या सर्वांना सुखरुप साता-यात आणण्यात सातारा जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले होते. अपघातानंतर सर्व ट्रेकर्स घाटात अडकून पडले होते, कोणतेही वाहन थांबत नव्हते. मात्र, सातारा प्रशासकीय यंत्रणेच्या जोरदार हालचालीनंतर ट्रेकर्स सुखरुप घरी परतले आहेत.
सातारा जिल्ह्यातील गेल्यावर्षी झालेल्या भुस्खलनावेळी आपत्कालीन टीम येईपर्यंत सर्वांना हातावर हात ठेवून बघत बसण्याची वेळ येत होती. स्थानिक ग्रामस्थांनी जसे जमेल तसे मदतकार्य करुन लोकांना मदत केली होती. या मदतकार्यात काही ग्रामस्थांना जायबंदी व्हावे लागले, तर काहींना आपला जीवही गमवावा लागला.