23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeमहाराष्ट्रपरप्रांतीयांवर दोषारोप, अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

परप्रांतीयांवर दोषारोप, अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.१४ (प्रतिनिधी) साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रातीयांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करत यापुढे परप्रांतीय कुठून येतात कुठे जातात यांचा हिशोब ठेवावा लागेल असे वक्तव्य करून जणू परप्रांतीय नागरिकच बलात्कारी व गुन्हेगार असल्याचे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण केली आहे. त्यामुळे कलम १५३- अ अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच या विधानाला प्रसिद्धी देणाऱ्या ‘दै.सामना’च्या च्या संपादिका रश्मी ठाकरे व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी पोलीसांकडे केली आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी काम करण्याचे सोडून ठाकरे सरकार वसुली करण्यात मग्न आहे, राज्यात दिवसागणिक बलात्कार व महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होत असताना व ठाकरे सरकारमधील मंत्री व नेतेच बलात्कारी असताना सुद्धा मुख्यमंत्री मात्र परप्रांतीय नागरिकांना लक्ष करीत आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, नगरसेवक नामदेव भगत, शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने, नालासोपाऱ्याचा शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाले आहेत, हे सर्व शिवसेनेचे नेते परप्रांतीय आहेत का? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

मागील सात महिन्यात एकट्या मुंबई शहरात ५५० महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत, धक्कादायक म्हणजे यात तब्बल ३२३ अल्पवयीन मुली सुद्धा आहेत. यातील किती आरोपी परप्रांतीय आहेत याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यावा अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केला आहे. पुढील चार दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा सुद्धा त्‍यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या