22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्याच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर

राज्याच्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातील खातेवाटेप आजअखेर झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते कायम असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थखात देण्यात आले आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबादारी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात, माहिती व जनसंपर्क विभागासह पणन, परिवहन, सामाजिक न्याय आणि विशेष सहायता असणार आहे. तर मंत्रीमंडळ विस्तारात वित्त व नियोजन आणि गृहखातं या सारखी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीसांकडे सोपविण्यात आली आहे. राधाकृष्णविखे पाटील महसूल मंत्रालयासह त्यांच्याकडे दुग्धविकास तसेच पशुसंवर्धन मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. सुधीर मुनगंटीवार वन आणि सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची जबाबादारी सोपविण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयासह संसदीय कार्यमंत्रालयाची धुरा सोपविण्यात आली आहे.

विजय कुमार गावित यांच्याकडे आदिवासी मंत्रालयाची, गिरीश महाजन यांच्याकडे ग्रामविकास आणि पंचायत राजसह वैद्यकीय शिक्षण विभाग देण्यात आला आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर दादा भुसे यांना बंधारे व खणीकर्म सोपविण्यात आलं आहे. तर संजय राठोड यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन देण्यात आलं. तर सुरेश खाडे यांना कामगार खात्याची जबाबदारी देण्यात आली असून उदय सावंत यांना उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या