22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रसकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकानांना परवानगी द्या; मुंबईत व्यापा-यांची मागणी

सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकानांना परवानगी द्या; मुंबईत व्यापा-यांची मागणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील कापड व्यवसायाची स्थिती सध्या भीषण आहे. कोरोनाची लाट काहीशी आटोक्यात येत असताना किमान सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान दुकाने सुरू करू द्या, अशी मागणी कापड व्यावसायिकांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांना पत्र लिहिले आहे.

कापड उद्योगातील सर्वाधिक उलाढाल नवरात्रादरम्यान होते. पण मागील वर्षी गरबा बंद असल्याने व्यापा-यांचा त्यादरम्यानचा व्यवसायदेखील बुडाला. दिवाळीतही फार उलाढाल झालीच नाही. तर विवाह सोहळेदेखील फार उत्साहात होत नसल्याने एकूणच या क्षेत्राला उतरती कळा आली आहे.

त्यातच आता पुन्हा नव्याने निर्बंध आले. त्यामुळेच व्यावसायिकांची व त्यांच्याकडील कर्मचा-यांची अवस्था बिकट झाली आहे, असे शेख यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मुंबईत जवळपास कापडाची १० हजार दुकाने आहेत. त्यातील किरकोळ विक्रेत्यांचा आकडा ५ हजार आहे. या क्षेत्रातील रोजची उलाढाल ६० ते ८० लाख रुपये आहे. मागील लॉकडाऊनदरम्यान या क्षेत्राचे १५० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. त्यात सुमारे सव्वा लाख लोकांचा रोजगार बुडाला.

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या