23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमनोरंजन‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने वाढवले वजन?

‘पुष्पा २’साठी अल्लू अर्जुनने वाढवले वजन?

एकमत ऑनलाईन

मुंबई : साऊथचा अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राईज’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाल्यानंतर आता चाहते त्याच्या पुढच्या भागाची अर्थात ‘पुष्पा : द रुल’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, अल्लू अर्जुन त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. नुकताच अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या सेटवर स्पॉट झाला. यावेळी अभिनेता वाढलेले केस आणि दाढीसह ‘पुष्पा’ लूकमध्ये दिसला.

मात्र, यावेळी त्याचे वजन प्रचंड वाढलेले दिसले.
अल्लू अर्जुनने ‘पुष्पा २’साठी वजन वाढवले आहे. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द रुल’ या चित्रपटातील लूकचे हे फोटो पाहून चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. तर, सोशल मीडियावर या चित्रपटाच्या कथेला नेमकं काय वळण मिळेल, याचा अंदाज लावताना दिसत आहेत. मात्र, या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने आपले वजन खूप वाढवले ​​आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी हा फोटो शेअर केला आहे.

वाढलेल्या वजनामुळे अभिनेता ट्रोल!
अल्लू अर्जुनचा हा लूक पाहून काही चाहते त्याचे कौतुक करताना दिसले तर, काही मात्र त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते. ट्रोलर्सनी अल्लू अर्जुनला ट्रोल करण्याची ही संधी देखील सोडली नाही. अल्लू अर्जुनचे अनेक चाहते त्याच्या या फोटोवर कमेंट करताना दिसले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या