24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रविधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे !

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचे अंबादास दानवे !

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस केली होती. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी त्­याला मान्यता दिली आहे.

विधान परिषदेत शिवसेनेचे १२, राष्ट्रवादीचे १० तर काँग्रेसचे १० सदस्य आहेत. विधान परिषदेत विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचा सदस्य नेमावा असे पत्र उपसभापती नीलम र्गो­हे यांना शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यानंतर अंबादास दानवे यांच्या नावाची विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी नियुक्ती करण्यात यावी अशी शिफारस करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पत्र सोमवारी ८ ऑगस्ट रोजी शिवसेना उपनेते अरंिवद सावंत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम र्गो­हे यांना सुपूर्द केले होते. त्यानंतर आज ९ ऑगस्ट रोजी दुपारी उपसभापती नीलम र्गो­हे यांनी विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या