25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रअंबानी कुटुंबीयांचा तीन तासांत खात्मा करणार

अंबानी कुटुंबीयांचा तीन तासांत खात्मा करणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आठ वेळेस धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. अँटिलिया प्रकरणानंतर दुसऱ्यांदा धमकी आल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केली आहे. या फोन कॉलमुळे खळबळ उडाली आहे.

मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने तीन तासात अंबानी कुटुंबीयांना ठार करणार असल्याची धमकी दिली. रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयाच्या क्रमांकावर हा धमकीचा फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

आठ वेळेस धमकी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी यांना धमकी देणारे आठ फोन कॉल्स आले होते. या फोन कॉलची चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे आठही फोन कॉल्स आजच आले. येत्या तीन तासांत अंबानी कुटुंबीयांचा खात्मा करणार असल्याची धमकी या दरम्यान देण्यात आली. पोलिसांचे एक पथक रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला जात असून अधिक माहिती घेतली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या