25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रअमित ठाकरेंनी केला लोकलने प्रवास

अमित ठाकरेंनी केला लोकलने प्रवास

एकमत ऑनलाईन

अंबरनाथ : अंबरनाथ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज (शुक्रवार) दादर ते अंबरनाथ असा लोकल ट्रेनने प्रवास केला. सध्या त्यांनी राज्यभरातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी महासंपर्क अभियान सुरू केले आहे. या निमित्त ते राज्यभरात विविध ठिकाणी दौरे करत आहेत.

सकाळी अकराच्या सुमारास अमित ठाकरे यांचे अंबरनाथमध्ये आगमन झाले. अमित ठाकरे अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेत आपल्या दौ-याची सुरुवात करणार आहेत. अंबरनाथच्या रोटरी सभागृहात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यानंतर बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांमध्येही अमित ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीनही शहरांमध्ये मनसेची परिस्थिती तोळामासा आहे. उल्हासनगर आणि बदलापूर शहरात मनसेचा एकही नगरसेवक गेल्या पालिकेत नव्हता. अंबरनाथमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके नगरसेवक मनसेचे होते. त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी १५ दिवसांत मुंबईतील हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर नवीन नेमणुका जाहीर केल्या. यानंतर अमित ठाकरे सात दिवसांसाठी कोकण दौ-यावरही गेले होते. या सात दिवसांत अमित ठाकरेंनी तालुका तसेच गाव पातळीवरील स्थानिक मनसे पदाधिकारी तसेच मनविसे पदाधिकारी आणि महाविद्यालयीन तरुण-तरुणींशी संवाद साधला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या