24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeमहाराष्ट्रअमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची प्रकृती स्थिर

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची प्रकृती स्थिर

एकमत ऑनलाईन

मुंबई : खासदार नवनीत कौर राणा यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीस कोरोनावर घरीच उपचार सुरू होते, मात्र, त्रास वाढू लागल्याने त्यांना नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांची प्रकृती अजून खालावल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. नुकताच नवनीत राणा यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात आपण आयसीयूतून बाहेर आलो असून प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

“लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून आज मला सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. आपल्या प्रार्थनांमुळे मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गेले पाच-सहा दिवस मी अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास केला. आपण चिंता करु नका. माझी लहान मुलंसुद्धा काळजी करत आहेत, त्यांनाही मी हा व्हिडीओ पाठवत आहे. मी आणखी चांगली कामे करावी म्हणून देवाने मला पुन्हा संधी दिली आहे. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार” असे नवनीत राणा व्हिडिओच्या माध्यमातून बोलत आहेत.

‘मॉँ तुझे सलाम’ होतेय तुफान लोकप्रिय : कप सॉँग आहे तरी काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या