27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्र‘अब देवेंद्र अकेला नही है’ म्हणत अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

‘अब देवेंद्र अकेला नही है’ म्हणत अमृता फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अपेक्षेप्रमाणे यश संपादन केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या विजयाचे श्रेय दिले जात आहे. याबद्दल बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘‘हो, मला नक्कीच खूप आनंद झाला आहे. ‘‘अब देवेंद्र अकेला नही है, ना कभी था, उनके साथ पुरी कायनात है’’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या पतीचं कौतुक केलं आहे.

‘‘जो विकासाचं राजकारण करेल तोच दुनियात पुढे जाईल, टोमणेबाजीचे राजकारण करणारे मागे राहतील,’’ असेही त्या म्हणाल्या. भाजपाने रडीचा डाव खेळला यावरुन झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘‘जी लोक सोबत आली आहेत, ती प्रेमाने सोबत आली आहेत. सरकार कसे चालते हे त्यांना कळाले आहे. भाजपा जे काही करत आहे, ते कर्तृत्वाच्या जोरावर करत आहे. रडीचा डाव खेळण्यासाठी ते महाविकास आघाडी नाही. भाजपा हा भाजपा आहे. ती कर्तृत्ववाचा डाव खेळते.’’ यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत देखील भाष्य केले. राज्यसभा निवडणुकीत आपला विजय झाल्याने विधान परिषदेतही विजय मिळेल यात काहीच दुमत नाही, असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रजेसाठी किती योग्य आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी कोणी काही बोलत नव्हते. पण आता प्रत्येक नागरिक बोलत आहे. त्यामुळे आता मला बोलायची गरज नाही. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस किंगमेकर ठरले आहेत. याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. यामध्ये विजयी झालेले पियुष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे या सर्वांना शुभेच्छा. सत्याचा विजय झालेला आहे. सत्याच्या बाजूने सगळेजण आहेत, याचा मला आनंद आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या