21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्राइमनागपुरात ११ वर्षीय चिमुरडीवर १० नराधमांकडून अत्याचार

नागपुरात ११ वर्षीय चिमुरडीवर १० नराधमांकडून अत्याचार

एकमत ऑनलाईन

नागपूर : आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पालक कामावर गेले असताना अकरा वर्षीय चिमुकली तिच्या बहिणीसोबत घरी एकटी असल्याचा फायदा घेत शेजारी राहणा-या नराधमाने चिमुकलीला घरी बोलवत अत्याचार केला. यानंतर सतत दीड महिने आपल्या इतर १० साथीदारांना बोलवून चिमुकलीवर अत्याचार करत होता.

पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी महिला कर्मचा-यांना पाठवून या माहितीची शहानिशा केली आणि दहाही नराधमांना अटक केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी रोशन कारगावकर (वय २९) हा चिमुकलीच्या घराशेजारीच राहतो. त्याची या चिमुकलीकडे वाईट नजर गेली आणि त्याने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले. रोशनचे परिसरात चषम्याचे छोटे दुकान आहे. तसेच त्याला काही दिवसांपूर्वी उमरेड पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात भादंवी ३०२ अंतर्गत अटक केली आहे. या खुनाच्या घटनेच्या तपासादरम्यान माहिती घेतली असता नराधम रोशनच्या या कृत्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या पूर्ण घटनेचा छडा पोलिसांनी लावला.

असे उघड झाले नराधमाचे कृत्य
खुनाच्या आरोपात अटकेत असलेल्या रोशनबाबत पोलिस तपास करत होते. यादरम्यान याने घराशेजारी राहणा-या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल झाली नसल्याने या घटनेच्या पडताळणीसाठी पोलिसांनी महिला कर्मचा-यांना वेशांतर करून चौकशीसाठी पाठवले

. त्यानंतर पोलिस तपासात या नराधमासह आणखी ९ जणांनीही या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती उघड झाली. ही माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. सध्या सर्व आरोपींना ३० जुलैपर्यंत पीसीआर देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या