23.4 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeमहाराष्ट्रकारमध्ये सापडली ४३ लाखांची रक्कम

कारमध्ये सापडली ४३ लाखांची रक्कम

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शुक्रवारी उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना चिंचवड मधील दळवीनगर परिसरात एका कारमध्ये निवडणूक विभागाच्या अधिका-यांना एका मोटारीत तब्बल ४३ लाखांची रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. मात्र भाजपकडून अजून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष देखील निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आजचा दिवस यात महत्त्वाचा मानला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या