16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न

राज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केल्यानंतर आम्ही त्यामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. ७२ तासात राज्याच्या माजी मंर्त्यावर दोन-दोन गुन्हे दाखल होतात. यातून नाराज होऊन जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्याचं म्हंटलं होतं. परंतु, जे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, त्यातून विनयभंग झाल्याचे कोठेही दिसत नाही. घटना घडलेल्या ठिकाणी मुख्यंमत्री स्वत: उपस्थित होते. त्यांनी पोलिसांना सांगावं की असं काही घडलं नाही म्हणून. पण अशा कारवाया करून जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. राज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान ३५४ (विनयभंग) अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आव्हाड यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अजित पवार यांनी आव्हाड यांच्या निवास्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी आव्हाडांवरील आरोप फेटाळून लावले.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कोठेही आक्षेपार्ह दिसलं नाही. परंतु, जाणून बुजून अशा कारवाया करण्यात येत आहेत. संपूर्ण महाविकास आघाडी जितेंद्र आव्हाड यांच्या पाठिशी आहे. राज्यातील लोकशाही टिकली पाहिजे. येणा-या परिस्थितीविरोधात आम्ही लढा देऊ. चूक असेल तर नक्की कारवाई करा, पण जर जनमानसात प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा कारवाया केल्या जात असतील तर हे लोकशाहीसाठी खूप घातक आहे, अशी खंत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या