22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रअमरावतीत कॉलराचे थैमान; आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

अमरावतीत कॉलराचे थैमान; आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये ९० दिवसांत ५२ बालके दगावल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलराची लागण झाल्याने कॉलराची लागण झाल्यामुळे एका २ वर्षी चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

तर कॉलरामुळे जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अचलपूर तालुक्यातील शिंदी बू. गावातील वेदश्री निलेश मेहरे वय २ वर्ष या चिमुकलीला कॉलराची लागण झाल्याने तिच्यावर सावंगी मेघे येथे उपचार सुरू असताना काल अखेर मृत्यू झाला, तिच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

सिंदी गावातील पाणीपुरवठा योजना चार वर्षापासून बंद आहे. त्यामुळे लोकसहभागातून बोरवेल करून घेतल्या आहेत. या बोअरवेलमधून गावक-यांनी टाकलेल्या पाइपलाइन चक्क सांडपाणी वाहून नेणा-या नाल्यामधून गेल्या आहेत. त्यामुळे हेच दूषित पाणी गावकरी पितात त्यामुळे वैदश्रीचा मृत्यू झाला असा आरोप गावक-यांनी केला.
यापूर्वी मेळघाटातील पाचडोंगरी, कोयलारी येथील ४ तर वलगाव येथील १अशा ५ नागरिकांचा कॉलेराने मृत्यू झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या