26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रअनन्याची होणार सखोल चौकशी

अनन्याची होणार सखोल चौकशी

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री अनन्या पांडे हिची येत्या सोमवारी पुन्हा एकदा एनसीबी चौकशी करणार आहे. दरम्यान एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी जेव्हा अनन्या पांडेची चौकशी केली जाईल, त्यावेळी केवळ व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारावरच कोणतीही चौकशी केली जाणार नाही. एनसीबी सोमवारी अनन्या पांडेला संशयास्पद आर्थिक व्यवहार, आरोपींचे स्टेटमेंट आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे याबाबत चौकशी करेल. दरम्यान, अनन्याचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट फॉरेन्सिक विभागाकडे देण्यात आले आहे. त्यामुळे सखोल चौकशी होणार आहे.

एनसीबीने २ दिवस चौकशी केल्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता अनन्या पांडेला पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी चौकशीपूर्वी एनसीबीला आपली तयारी पूर्ण करायची आहे.एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री अनन्या पांडेचे ७ इलेक्ट्रॉनिक गॅझेट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. यामध्ये मोबाईल आणि लॅपटॉपचाही समावेश आहे. या फॉरेन्सिक तपासणीद्वारे एनसीबीला चॅट्स आणि इतर तपशील जाणून घ्यायचे आहेत, जे कदाचित हटवण्यात आले असतील. एनसीबीला हे चॅट्स रिट्रीव करायचे आहेत. जर सोमवारपर्यंत हा डेटा रिट्रीव झाल्यास अनन्या पांडेची त्या आधारावर चौकशी केली जाईल.

शुक्रवारी एनसीबीनें अनन्याची साडेतीनतास कसून चौकशी केली. आर्यनच्या मोबाईलमध्ये ड्रग्जसंदर्भातील अनन्यासोबत केलेले चॅट सापडले. एनसीबीने गुरुवारी अनन्याच्या घरी जाऊनही तपासणी केली. शुक्रवारी चौकशीदरम्यान अनन्याने आर्यनला एक ते दोन वेळा गांजा दिल्याचे एनसीबीला सांगितले. मात्र आपण कोणत्याच ड्रग्ज सप्लायरच्या संपर्कात नसल्याचे तिने म्हटले. या अगोदर तिची गुरुवारीदेखील चौकशी केली होती.

अनन्याच्या खुलाशाने आर्यन अडचणीत?
अनन्या पांडेने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे आर्यन खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनन्या पांडेने आर्यनला गांजा दिला असल्याची कबुली दिली आहे. अनन्याची आर्यनसोबत चॅटिंग केल्यावरून एनसीबी तिची चौकशी करत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या