28.7 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home महाराष्ट्र अंगणवाडी सेविकांना मिळणार दोन हजार रुपये भाऊबीज !

अंगणवाडी सेविकांना मिळणार दोन हजार रुपये भाऊबीज !

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. १२ – कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत मोलाची कामगिरी बजावणाठया राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची यंदा दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीच्या पाश्र्वभूमिवर राज्य सरकारने या मानधनी कर्मचाठयांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला असून ही भेट दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

राज्यात ९३ हजार ३४८ अंगणवाडी सेविका, ८८ हजार ३५३ अंगणवाडी मदतनीस व ११ हजार ३४१ मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ३८ कोटी ६१ लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचविला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावल्याचे यशोमती ठावूष्ठर यांनी सांगितले.

कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानातही घरोघरी जाऊन महत्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा शासनाला अभिमान आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे, असेही मंत्री अ‍ॅड. ठाकूर म्हणाल्या

डिजिटल माध्यमांवर केंद्राचा अंकुश योग्य बाब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या