26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुख कारागृहात चक्कर येऊन पडले

अनिल देशमुख कारागृहात चक्कर येऊन पडले

एकमत ऑनलाईन

मुंबई : अनिल देशमुख आज अर्थर रोड कारागृहामध्ये अचानक चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्याने व त्रास जास्त असल्याने त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे. त्यांचा रक्तदाब वाढला आहे व ईसीजी दोष आढळला असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांची तपासणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच त्रास होत असल्याने त्यांना सुरुवातीला जेजे रुग्णालयात व नंतर ङएट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

अनिल देशमुख हे सध्या अर्थर रोड तुरुंगात आहेत, ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. कारागृहातच चक्कर येऊन पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार आज सकाळी अकरा वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थर रोडचे अधिकारी आणि वैद्यकीय अधिका-यांनी त्यांची तपासणी केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, जेथे त्यांचा रक्तदाब जास्त असल्याचे समोर आले. त्यामुळे दोन ते तीन दिवस त्यांना अजून जेजे रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. दोन महिन्यापूर्वी देखील त्यांची अशीच तब्यत बिघडली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या