26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुख : सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची गरज नाही

अनिल देशमुख : सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची गरज नाही

एकमत ऑनलाईन

रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली होती

मुंबई  :  14 जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येला नुकताच एक महिना पूर्ण झाला आहे. सुशांतने तणावाखाली येत आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी व्हावी याची मागणी केली जातेय.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं म्हटलंय. मुंबई पोलीस सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सविस्तर चौकशी करतायत. त्यामुळे सीबीआयच्या चौकशीची गरज नाही, असं अनिल देशमुख म्हणालेत.

रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली होती. आत्महत्या करण्यासारखा सुशांतवर कोणता दबाव होता हे जाणून घ्यायचं आहे, अशा आशयाचं रियाने ट्विट केलं होतं.

जन अधिकार पक्षाचे नेते पप्पु यादव यांनीही सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी करावी, अशी विनंती त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना केली होती. याबाबत पप्पु यादव यांच्या पत्राचा विषय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी संबंधित आहे. त्यामुळे ते पत्र संबंधित मंत्रायलाकडे पाठवण्यात येत असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं.

Read More  रणबीरचा डुप्लीकेट : जुनैद शाहचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे मृत्यू

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या