19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्रअनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ

एकमत ऑनलाईन

नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक दाखल झाले आहे. साबीआयचे पथक अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांचा अटक वॉरंट घेऊन आले असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आली नाहीये.

गेल्या काही महिन्यांपासून अनिल देशमुख हे गायब आहेत. अनिल देशमुख यांना वारंवार समन्स बजावल्यानंतरही ते चौकशीसाठी हजर होत नसल्याने त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटिसही काढण्यात आली असल्याची चर्चा होती. त्यानंतर आयकर विभागानंही अनिल देशमुखांच्या घरावर धाड टाकली होती. आता सीबीआयचे पथक देशमुखांच्या घरी दाखल झाले आहेत.

आज सकाळी ७ वाजता सीबीआयचे पथक दाखल झाले आहेत. सीबीआयचे एकूण ५ ते ६ अधिकारी देशमुख यांच्या घरी पोहचले आहेत. मात्र, अनिल देशमुख त्यांच्या नागपुरातील घरीही नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून ते गायब आहेत.

सीबीआयचे पथक देशमुखांच्या नागपुरातील घरी पोहोचल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी देशमुखांच्या घरासमोर आंदोलन केले. तसेच, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीपण केली.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे वारंवार समन्स बजावल्यानंतरही चौकशीसाठी हजर होत नसल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशा विनंतीच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अर्जाची अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी दखल घेतली. न्यायालयाने देशमुख यांच्याविरोधात ‘प्रोसेस’ (कायदेशीर प्रक्रिया) म्हणजेच कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या