Thursday, September 28, 2023

अनिल डिग्गीकर सिडकोचे उपाध्यक्ष, संजय मुखर्जी एमएमआरडीए आयुक्त

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे सरकार प्रशासनात मोठे फेरबदल करीत असून शुक्रवारी २० सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्यानंतर आज आणखी ५ वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्याकडे सिडकोच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिडकोचे उपाध्यक्ष संजय मुखर्जी यांना पदोन्नती देऊन एमएमआरडीएचे आयुक्त करण्यात आले आहे. मनीषा म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस सरकार अधिक स्थिर झाले असून प्रशासनात मोठे फेरबदल सुरू केले आहेत. शुक्रवारी २० वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या करताना महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात साईड पोस्टिंगला गेलेल्या अनेक अधिका-यांना पुन्हा महत्त्वाच्या पदावर आणले गेले. आजही आणखी ५ वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या. म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्याकडे सिडकोच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सिडकोचे उपाध्यक्ष संजय मुखर्जी यांना पदोन्नती देऊन एमएमआरडीएचे आयुक्त करण्यात आले आहे. मनीषा म्हैसकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डॉ. के. गोविंदराज हे नगर विकास खाते (२) प्रधान सचिव म्हणून तर आशिष शर्मा यांची एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२४ तासांत बदली
मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशिष शर्मा यांची काल नगर विकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली होती. या नियुक्तीला पुरते २४ तास होत नाहीत तोवर त्यांची एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेला सारू या दोघांनी आपला ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करूनही त्यांची बदली अजून तरी करण्यात आलेली नाही.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या