22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमहाराष्ट्रअनिल परबांच्या अडचणीत वाढ?

अनिल परबांच्या अडचणीत वाढ?

एकमत ऑनलाईन

मुरूड : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे वारंवार आरोप करत होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकली. अनिल परब यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

त्याच दरम्यान आता कोकणातून एक मोठी बातमी आली आहे. वादग्रस्त साई रिसॉट प्रकरणाच्या संबंधित कागदपत्रे आता ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड येथील वादग्रस्त साई रिसॉर्टवर धाड टाकल्यानंतर ईडीच्या अधिका-यांनी मुरूड ग्रामपंचायतीमधून रिसॉर्टच्या संबंधातील कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत. रीतसर अर्ज करून मुरूड ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ईडीच्या अधिका-यांनी ही माहिती मिळवल्याची सूत्रांची माहिती आहे.

किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत साई रिसॉर्टच्या संबंधित काही कागदपत्रे सादर केली होती. या सर्व कागदपत्रांच्या प्रती अधिकृतपणे ईडीच्या अधिका-यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या