37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रकोकणवासियांसाठी मुंबईत जाण्यास पर्यायी मार्गाची घोषणा

कोकणवासियांसाठी मुंबईत जाण्यास पर्यायी मार्गाची घोषणा

रेवस-रेडी सागरी महामार्गाची निर्मिती; ९ हजार ५७३ कोटींची तरतूद

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांसाठी मोठी घोषणा केली. कोकणाच्या विकासासाठी रेवस-रेडी या मुंबईत जाण्यासाठी पर्यायी सागरी महामार्गाची घोषणा करण्यात आली. त्यासाठी तब्बल ९ हजार ५७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या सागरी महामार्गामुळे मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील ताण कमी होईल. हा रस्ता ५४० किलोमीटर लांबीचा असेल असेही अजित पवार यांनी सांगितले.

मागील अनेक दशकांपासून या सागरी महामार्गाची चर्चा सुरु होती. मात्र यंदा त्याला मुर्त रुप आले आहे. रेवस (जि. रायगड) ते रेडी (जि. सिंधुदुर्ग) असा हा सागरी महामार्ग असणार आहे. बॅरिस्टर अंतुले वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले तेव्हा त्यांनी या सागरी महामार्गाच्या कामाला चालना दिली. तत्पूर्वी कोकणातील ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांनी अशा किनारी महामार्गाची मागणी राज्य सरकारकडे अनेकदा केली होती. वेंगुल्यातील काही अभ्यासू कार्यकर्त्यांनी तर हा सागरी महामार्ग कसा असावा याचा एक आराखडाच तयार केला होता. मात्र बॅ. अंतुले यांच्यानंतर या विषयाकडे दुर्लक्ष झाले.

अनेक वर्षांपासूनची मागणी
राज्यात गेल्यावर्षी महाविकास आघाडीचे सरकार बनल्यापासून पुन्हा त्यावर विचारविनिमय सुरु झाला. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये या महामार्गाचा सुधारित आराखडा नव्याने सादर करण्यात आला. तसेच हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले. या महामार्गावरील सहा पुलांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र त्या पुलांना जोडरस्ते उपलब्ध नसल्याने त्यांचा वाहतुकीसाठी उपयोग करता येत नाही.

संपुर्ण राष्ट्रीय किनारपट्टीसाठी लाभदायक
भारताची पश्चिम किनारपट्टी गुजरातमधील कांडला बंदर ते तामिळनाडूतील कन्याकुमारी अशी सुमारे तीन-साडेतीन हजार किलोमीटर लांबीची आहे. अनेक ठिकाणी तुटक-तुटक स्वरूपात सागरी किनारपट्टीलगत हा मार्ग अस्तित्वात आहे. मध्ये येणा-या लहानमोठयÞा नद्यांमुळे निर्माण झालेल्या खाड्यांवर पूल बांधून हा मार्ग जोडला गेलेला आहे, परंतु अजून काही मोठे पूल पूर्ण व्हावयाचे आहेत. याच किनारपट्टी लगतच्या मार्गापैकी रेवस रेडी हा महामार्ग आहे. रेवस रेडी महामार्ग झाल्यास संपुर्ण राष्ट्रीय किनारपट्टीलाच फायदा होणार आहे.

ईस्टर्न फ्री वे ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या