मुंबई : पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठं पाऊल उचललं आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी यु ट्यूब चॅनेल सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भिती आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने यासंबंधी वेगाने पावलं उचलत आता विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही तसंच त्यांना या काळात देखील घरबसल्या शिक्षण घेता यावं यासाठी वेगाने पावलं उचलण्याच्या तयारीत आहे.
मराठी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी युट्यूब चॅनेल सुरू होणार आहे. यासोबतच लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी देखील युट्यूब चॅनेल सुरू होणार असल्याची देखील माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता जिओ टीव्ही वर शासनाने 12 चॅनेल सुरू केले आहेत. महाराष्ट्र हे देशातलं एकमेव असं राज्य आहे की ज्या राज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरू केले आहेत.
Read More ‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी, आई भवानी मातेचा उपासक’ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू