28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeमहाराष्ट्रजालन्यात आणखी नव्या 28 रुग्णांची भर

जालन्यात आणखी नव्या 28 रुग्णांची भर

एकमत ऑनलाईन

जालना जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या 648 वर

जालना । जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. आज पुन्हा नव्याने 28 रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा आता 648 वर जाऊन पोहोचला आहे.

57 अहवाल अजूनही प्रयोगशाळेकडे प्रलंबित

जिल्हा सरकारी रुग्णालयातर्फे काल सायंकाळी 154 संशयितांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळकडे पाठवण्यात आले होते. यामध्ये 28 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे, तर 97 जणांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. 57 अहवाल अजूनही प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहेत.

कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही 648 वर जाऊन पोहोचली

आज पॉझिटिव्ह प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये भोकरदनमधील 8, अंबड 2, जाफराबाद 1, तर जालना शहरातील 17 जणांचा समावेश आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची रुग्णसंख्या ही 648 वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Read More  मेक इन इंडिया : कोवाक्सिन 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या