24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमनोरंजनअनुष्का आवडती सहकारी : रणबीर कपूर

अनुष्का आवडती सहकारी : रणबीर कपूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले. त्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चाही होती. आलियाशी लग्न करण्याअगोदर रणबीरचे नाव काही प्रसिद्ध अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. त्यामध्ये दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे.

सध्या रणबीरबाबत एक बातमी व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याचे आणि अनुष्का शर्माचे भांडण झाले होते असा उल्लेख आला आहे. रणबीरने एक मोठा खुलासा केला आहे. सध्या रणबीर हा त्याच्या ‘शमशेरा’मुळे चर्चेत आहे. त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ नावाचा चित्रपटही प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

जेव्हा ‘शमशेरा’च्या प्रमोशनच्या वेळी रणबीरला तुला आवडणारी सहकारी अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने अनुष्का शर्माचे नाव सांगितले.

रणबीरला अनुष्काबद्दल आणखी काही प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, आमच्यात अबोला झाला याचे कारण आमच्यात झालेली भांडणं. आम्ही दोघेही एकमेकांशी खूप भांडलो होतो. आमचा राग अनावर झाला होता. त्यानंतर बराच काळ आमच्यात अबोला होता. आम्ही आता एकमेकांचे चांगले मित्र आहोत. अनुष्कासोबत भूमिका करणं हा मोठा आनंद असतो. ती क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे. प्रोफेशनल आहे. तिच्याशी संवाद साधणे आनंददायी बाब असते, असेही रणबीरने यावेळी सांगितले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या