32.9 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home महाराष्ट्र चिंता वाढली : ठाणे आयुक्तालयात ३० पोलिसांना कोरोनाची लागण

चिंता वाढली : ठाणे आयुक्तालयात ३० पोलिसांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील एका निरीक्षकासह तब्बल ३० पोलीस कर्मचाऱ्यांना बुधवारी एकाच दिवसात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत पोलिसांना लागण झाल्याचे हे सर्वाधिक प्रमाण असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

२५ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत आले समोर

कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकासह एका पोलीस नाईकालाही २५ जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले. त्यापाठोपाठ राज्य राखीव पोलीस दलातील ११, बदलापूर पोलीस ठाण्यातील चार, मुख्यालयातील चार, भिवंडी नियंत्रण कक्षातील दोन, वागळे इस्टेटचे एक जमादार तसेच कोळसेवाडी, मोटर परिवहन, चितळसर आणि खडकपाडा या पोलीस ठाण्यातीलही प्रत्येकी एका कर्मचाºयाला कोरोनाची लागण झाली आहे. यातील राज्य राखीव दलाच्या जवानांना मरोळ येथील पीटीएस, कोरोना केंद्रात तर मुख्यालयातील दोघांना अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतरांवर ठाणे, बदलापूर आणि पुणे अशा वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

३१३ पोलिसांनी केली कोरोनावर मात 

आतापर्यंत ४२ अधिकारी आणि ३८७ कर्मचारी अशा ४२९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ३१३ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून तिघांचा मृत्यु झाला आहे. तर १२ अधिकारी आणि १०१ कर्मचारी अशा ११३ जणांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यापूर्वी चार दिवसांपूर्वी सर्वाधिक म्हणजे १७ पोलिसांना कोरोनाची एकाच दिवसात बाधा झाली होती. त्यानंतर आता थेट एकाच दिवसात ३० पोलीस बाधित झाल्याने पोलिसांची चिंता अधिक वाढली आहे.

Read More  खंडपीठाचे निर्देश : कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या