34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात ५५ हजारांवर नवे रुग्ण चिंता वाढली, २९७ रुग्णांचा मृत्यू

राज्यात ५५ हजारांवर नवे रुग्ण चिंता वाढली, २९७ रुग्णांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा कहर कायम असून आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ५५ हजार ४६९ नवीन रुग्ण आढळले आहेत तर त्याचवेळी २९७ रुग्ण दगावल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. एकट्या मुंबईत १० हजार रुग्णांची भर पडली आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. सोमवारी रुग्णसंख्येत थोडी घट झाल्यानंतर आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी भर पडली आहे.

त्यासोबतच राज्यात मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे ठाकले आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात वीकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लादण्यात आले असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. राज्यातील करोनाचे आजचे आकडे चिंतेत भर घालणारे ठरले आहेत. राज्यात आज २९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे.

आज दिवसभरात राज्यात ५५ हजार ४६९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५ लाख ८३ हजार ३३१ करोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ८२.९८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९ लाख १७ हजार ४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१ लाख १३ हजार ३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पावणेपाच लाखांच्या जवळ
राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा पाच लाखांकडे सरकला आहे. सध्या राज्यात करोनाचे ४ लाख ७२ हजार २८३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक ८४ हजार ३०९ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत तर मुंबईतील आकडाही धडकी भरवणारा आहे. मुंबईत आज १० हजारांवर रुग्ण वाढले. या नोंदीनुसार ७९ हजार ३६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आणखी ४ आठवडे चिंतेचे; केंद्र सरकारचा गंभीर इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या