20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeमहाराष्ट्रसीआययूच्या प्रमुखपदी मिलिंद काथेंची नियु्क्ती

सीआययूच्या प्रमुखपदी मिलिंद काथेंची नियु्क्ती

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची अर्थात क्राईम इंटेलिजन्स यूनिटची सूत्रे आता मिलिंद काथे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक मिलिंद काथे यांची क्राईम इंटेलिजन्स यूनिटच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून, तसे आदेश काढण्यात आले आहेत. अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिस गुन्हे शाखेचा गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग चर्चेत आला होता. वाझे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.

उद्योगपती अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर काही दिवसांतच या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रातील रेती बंदर परिसरात आढळून आला होता. या संपूर्ण प्रकरणावरून राज्यात बराच गदारोळ झाला. यात एनआयएने गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे तत्कालीन प्रमुख सचिन वाझे यांना अटक केली होती. त्याचबरोबर त्यांच्यावर मनसुख हिरेन प्रकरणात सहभाग असल्याचाही ठपका ठेवण्यात आला. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. त्यातच आता वाझे यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. काथे हे त्यांची जागा घेतील.

१०० कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? हायकोर्टाचा सवाल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या