26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमहाराष्ट्रअमेरिकेकडून मुंबई मॉडेलचे कौतुक

अमेरिकेकडून मुंबई मॉडेलचे कौतुक

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीववर योग्य नियोजन केल्यामुळे आणि कोरोना नियंत्रणात आणल्यामुळे मुंबई मॉडेलचे चक्क अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाने कौतुक केलेले आहे.

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सदस्य, कॉंग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्सच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य जे. लुईस कोरिया यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पत्र लिहून महापालिकेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून कोरोना काळात ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग, या चतु:सूत्रीचा यशस्वी अवलंब केल्यामुळे आणि युद्धपातळीवर कोरोनाची जम्बो रुग्णालये उभारल्यामुळे आणि ऑक्सिजननिर्मिती केल्यामुळे मुंबई मॉडेलचे कौतुक अमेरिकेने केलेले आहे.

वॉररुम करून गरजू रुग्णांना बेडचे वितरम संगणकीय प्रणालीद्वारे करणे, प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार आणि संसर्गाच्या प्रभावानुसार रुग्णालयात दाखल करून उपचार करणे, गरजू रुग्णाना योग्य प्राणवायू उपलब्ध करण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे याचा उल्लेख कोरिया यांनी पत्रात केला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ठरले बळीचा बकरा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या