25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रएसटी बस कर्मचा-यांच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी

एसटी बस कर्मचा-यांच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी

एकमत ऑनलाईन

लॉकडाऊनने आर्थिक गणित बिघडले : १ लाख ३ हजार कर्मचा-यांपैकी २७ हजार कर्मचारी ५० वर्षांवरील

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊनचा सामना करावा लागला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प राहिले. याची झळ एसटी बसला मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे. अशा परिस्थितीत वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाला खर्च बचतीसाठी नव्या योजना हाती घ्याव्या लागत आहेत.

त्याचाच भाग म्हणून एसटी महामंडळाने स्वेच्छा निवृत्ती योजनेला आज मंजुरी दिली. या योजनेनुसार ५० वर्षांवरील कर्मचा-यांसाठी ही योजना सुरू केली असून, एसटी महामंडळाच्या एकूण १ लाख ३ हजार कर्मचाºयांपैकी २७ हजार कर्मचारी ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

राज्य एसटी महामंडळाचा सर्वाधिक खर्च डिझेल खरेदी आणि कर्मचाºयांच्या वेतनावर होतो. त्यामुळे खर्चाची बचत करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने शुक्रवारी स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी दिली. या योजनेमुळे दर महिन्याला १०० कोटींची वेतन खर्चापोटीची बचत होणार आहे. दरम्यान, एसटीची स्वेच्छा निवृत्तीची योजना अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी संघटनेकडून उमटत आहेत.

एसटी महामंडळ निवृत्ती वय ५८ वर्षे आहे. त्यासाठी त्यांना उर्वरित प्रत्येक वर्षासाठी ३ महिन्यांचे वेतन मूळ (वेतन, महागाई भत्ता) देण्यात येणार आहे. सध्या एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला मान्यात देण्यात आली असली, तरी अंतिम मंजुरीसाठी आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे जाणार आहे.

Read More  राज्यपाल-गहलोत संघर्ष पेटला

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या