31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रअर्णब गोस्वामींना जामीन मंजूर

अर्णब गोस्वामींना जामीन मंजूर

सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; इतर दोघांनाही जामीन मंजूर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला असून, बुधवार दि़ ११ नोव्हेंबर रोजी अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या बेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली.

अर्णव गोस्वामींसाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्णव गोस्वामींविरुद्धची एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. हरीश साळवेंनी युक्तिवाद करताना अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईची हत्या करुन आत्महत्या केली, असा आरोप केला. हरीश साळवे यांनी अर्णव गोस्वामींविरुद्ध सूड भावनेने कारवाई होत असल्याचेही न्यायालयात सांगितले. महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेल्या चर्चेचा आणि इतर प्रकरणांचा दाखला साळवेंनी दिला.

उच्च न्यायालयाने फेटाळला होता अर्ज
अर्णव यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने एफआयआर रद्द करण्यासाठी आणि जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तीन दिवस त्यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर हायकोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत अर्णव यांना जामीन देण्यास नकार दिला होता. हे एक्सट्रा ऑर्डिनरी प्रकरण नाही. त्यामुळे जामिनासाठी ज्या प्रचलित यंत्रणा आणि पद्धती आहे. त्यानुसारच अर्ज करून जामीन घेण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले होते.

भारत-चीन सीमावादावर तोडगा निघणार ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या