25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रमहिला आमदारांची फसवणूक करणा-याला अटक

महिला आमदारांची फसवणूक करणा-याला अटक

एकमत ऑनलाईन

पुणे : आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल केला होता. महिला आमदारांची फसवणूक करणा-याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मुकेश राठोड असे या आरोपीचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आजारी होती म्हणून एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांना मदत मागितली होती. मदत म्हणून ती रक्कम ऑनलाईन माध्यमातून देण्यात आली होती. मात्र तो फेक कॉल असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या आमदारांनी तक्रार दिली. त्यानुसार पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत होते. अखेर दोन दिवसांनी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मला या माणसाचा फोन आला होता. त्याला मदत करण्यासाठी त्याने ऑनलाईन स्कॅनर पाठवले होते. कोणत्याच स्कॅनरवर सुरुवातीला पैसे जात नव्हते तेव्हा त्याने पर्यायी नंबर पाठवला. त्यावर मी पैसे पाठवले होते. आई आजारी आहे असे त्याने मला सांगितले होते. शिवाय मेडिकलच्या माणसाशीदेखील माझं बोलणं करून दिलं होतं.

त्यामुळे मी पैसे दिले होते. एका बैठकीसाठी ज्यावेळी आम्ही सगळ्या महिला आमदारांची भेट झाली त्यावेळी सगळ्यांनी हा प्रकार मला बोलून दाखवला. त्यानंतर आमची फसवणूक झाल्याचे समोर आले. आम्ही तातडीने पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार केली होती, असे भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या