22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये तब्बल १० मोर मृतावस्थेत आढळले

नाशिकमध्ये तब्बल १० मोर मृतावस्थेत आढळले

एकमत ऑनलाईन

नाशिक : नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील शिवारात दहा मोर मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे. वन विभागाने या दहाही मोरांच्या मृत्यूची नोंद घेतली असून, विषबाधेमुळे या मोरांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नांदगावपासून तालुक्यातील आमोदे शिवारातील गिरणा आणि मन्याड नदीच्या परिसरात ही घटना घडली. दीपक पगार हे शेतात जात असताना विठ्ठल लाला पगार यांच्या शेतात काही मोर तडफडत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने वनविभागाला या संदर्भात माहिती दिली. वन विभागाच्या अधिका-यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता जवळपास दहा मोर मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले.

आमोदे शिवारात गिरणा-मन्याड नदीचे पात्र असल्याने गेल्या काही दिवसांपासून मोरांची संख्या वाढलेली आहे. अन्न-पाण्याच्या शोधात हे मोर या भागात मोठ्या संख्येने येतात. शनिवारी या भागात अन्न-पाण्यासाठी दाखल झालेला मोरांचा थवा तडफडून मृत झाला. १० मोरांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या मोरांना शवविच्छेदनासाठी वेहेळगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांचे अवशेष काढून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

सदर मोरांचा मृत्यू हा विषबाधाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. वन विभागाचे आरएफओ चंद्रकांत कासार, वनरक्षक सुरेंद्र शिरसाठ, एन. के. राठोड, आर. के. दौंड, वनपाल सुनील महाले, वनमजूर विकास बोडखे आदींनी घटनेचा पंचनामा केला. याबाबत पुढील तपास नांदगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कासार हे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या