मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आशा भोसलेंनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या दादरमधील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
ठाकरे आणि मंगेशकर घराण्याचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. त्यामुळे राज यांची विचारपूस करण्यासाठी त्या आल्या होत्या. राज यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याचे निमित्त या भेटीमागे होते.