24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रआशिष शेलार तातडीने दिल्लीला रवाना

आशिष शेलार तातडीने दिल्लीला रवाना

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. सध्या मविआ आणि भाजपचे सर्व आमदार विविध ठिकाणी रिसॉर्टस्वर दाखल झाले आहेत. एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत आहेत. मात्र, यादरम्यान भाजपने वेगळी खेळी खेळायला सुरुवात केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याने त्यांच्या फिरण्यावर बंधनं आल्याने भाजपच्या वतीने प्रसाद लाड यांना मुंबईतील आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गिरीश महाजन यांच्यावर उर्वरित राज्यांतील आमदारांना गळाला लावण्याची जबाबदारी आहे. महाजन यांनी तत्काळ पालघरच्या हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपसाठी संकटमोचन होण्याचे काम ते करत आहेत.

दरम्यान, आशिष शेलार तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर दिली आहे. ते लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांच्या जवळचे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याने थेट मल्लिकार्जुन खरगे आज मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपकडून राज्यसभेसोबतच २०जूनला पार पडणा-या विधान परिषदेसाठी तयारी सुरू झाली आहे. यासाठी आशिष शेलार दिल्लीत वरिष्ठांसोबत खलबतं करणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या