22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रअशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट

अशोक चव्हाणांनी घेतली फडणवीसांची भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नवा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यानंतर आता त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्याने सत्तांतररानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या समजत आहे.

एकनाथ शिंदेंनी महत्त्वाच्या मंत्र्यांसह आमदारांना घेऊन बंड करत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला. कोलमडलेल्या शिवसेनेवर संकट आणत त्यांनी आपला वेगळा गट स्थापन करत भाजपासोबत सरकारही आणले. आता शिवसेनेनंतर या शिंदे गटाने आपला मोर्चा काँग्रेसकडे वळवल्याचे दिसत आहे. काँग्रेसही लवकरच फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सरकार स्थापन झाल्यावर जवळपास महिन्याभराने मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र हा विस्तारही केवळ पहिल्या टप्प्यातला. आता पुन्हा साधारण महिन्याभराचा काळ गेला असून दुस-या टप्प्यातला विस्तार अद्याप प्रलंबित आहे. आता हा दुस-या टप्प्यातला मंत्रिमंडळ विस्तार धक्कातंत्राने होण्याची माहिती मिळत आहे. यामध्ये नव्या चेह-यांना संधी मिळणार असून जुन्या नेत्यांचा आणि माजी मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबरमध्ये मंत्रीमंडळ विस्ताराची शक्यता
दुस-या टप्प्यात दोन महिलांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसचेही दोन मंत्री या मंत्रिमंडळात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचा एक मोठा गट येत्या काही दिवसांत भाजपात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन माजी मंत्र्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत हा विस्तार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या