27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडेच

मुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडेच

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई मेट्रोचा कारभार पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे यांच्याकडे कारभार सोपवण्यावरून बराच वाद निर्माण झाला होता पण आता शिंदे भाजप सरकार सत्तेत आल्यावर पुन्हा एकदा मुंबई मेट्रोचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मुंबई मेट्रो हा भाजपचा महाराष्ट्रातील ड्रिम प्रोजेक्ट होता. भाजप शिवसेना सरकार सत्तेत असताना त्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यावेळी अश्विनी भिडे यांची या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निवड करण्यात आली होती पण २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी भिडे यांची बदली केली होती. आता पुन्हा शिंदे सरकारने मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नेमणूक केली आहे.

दरम्यान मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून त्या चर्चेत आल्या होत्या. शिवसेनेचा मेट्रो कारशेड होण्यासाठी विरोध असल्यामुळे तत्कालीन ठाकरे सरकारने त्यांची बदली केली होती पण त्यांच्या नियुक्तीनंतर कारशेडचे काम पुन्हा सुरू होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या