अकोला : शिवसेना ठाकरे गटाचे अकोला महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मिश्रा आणि अहीर गटात किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारी झाली. यावेळी अनेकांच्या हातात लोखंडी पाईप आणि तलवारदेखील होती.
या हाणामारीत मिश्रा गटातील राजेश मिश्रा यांच्या हाताला आणि नाकाला गंभीर दुखापत झाली, तर अहीर गटातही काही लोकांना दुखापत झाली. मिश्रा यांना मात्र जास्त मार लागला.