28.9 C
Latur
Saturday, June 3, 2023
Homeमहाराष्ट्रबीबीसी डॉक्युमेंटरीविरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर

बीबीसी डॉक्युमेंटरीविरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत शनिवारी बीबीसीच्या डॉक्युमेंटरी विरोधात प्रस्ताव मंजूर केला. बीबीसीने नरेंद्र मोदी यांच्याविरोधात डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती. गुजरात दंगलीवरून नरेंद्र मोदींना सवाल करण्यात आले होते. त्यामुळे देशभरात भाजपमध्ये संतापाची लाट होती. यावर डॉक्युमेंटरीवर केंद्र सरकारने बंदी घातली होती.

दरम्यान, या डॉक्युमेंटरीवरून आज महाराष्ट्र विधानसभेतदेखील गोंधळ झाला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने बीबीसीच्या डॉक्युमेंटरी विरोधात ठराव मंजूर केला. महाराष्ट्र विधानसभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाशी संबंधित चित्रपटाचा निषेध करण्यात आला आहे. ब्रिटनची मीडिया संस्था – बीबीसीने एक डॉक्युमेंट्री बनवली होती. यामध्ये २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचार आणि दंगलीच्या वेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते आणि सुमारे २०-२१ वर्षे जुन्या घटनांचा उल्लेख आहे.

२००२ मध्ये गोध्रा येथे ट्रेन जाळल्यानंतर दंगल उसळली होती. त्यावेळी तत्कालीन राज्य सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले होते. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते, दंगलीच्या वेळी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बीबीसीने एक डॉक्युमेंट्री बनवली, त्यावर भारत सरकारने हा अपप्रचार असल्याचे सांगत बीबीसीने केवळ एक बाजू दाखवल्याचे म्हटले होते. तसेच त्यावर बंदीही घातली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या डॉक्युमेंट्रीवर बंदी घातली.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या