28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्ररुग्णाला दाखल करण्यासाठी आटापिटा : कोरोना रुग्णाचा ६ तास प्रवास

रुग्णाला दाखल करण्यासाठी आटापिटा : कोरोना रुग्णाचा ६ तास प्रवास

एकमत ऑनलाईन

वशिल्या शिवाय सामान्य माणसांना किंमत नसल्याचा गंभीर प्रकार : तक्रार कुणाकडे करावी हा प्रश्न

अहमदनगर : दुपारी बारापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णाला दाखल करण्यासाठी नातेवाईकांचा आटापिटा सुरूच होता. अखेर सायंकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने गुरुवारी कोरोनाची तपासणी केली.

शुक्रवारी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. प्रकृती बिघडल्याने नातेवाइकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यासाठी संपर्क केला, परंतु ती आली नाही. शेवटी नातेवाईकाने टेम्पोत रुग्णाला ठेवून रुग्णालयात नेले. प्रथम आनंद लॉन येथील मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये नेले. तेथे दीड ते दोन तास थांबायला लावल्यानंतर खाट शिल्लक नसल्याचे कारण देत दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले.

टेम्पो न्यूक्लियस रुग्णालयात नेण्यात आला. तेथेही काही खाट शिल्लक नसल्याचे कारण दिले गेले. रुग्णाच्या नातेवाईकांनी नगरसेवक कुमार वाकळे यांच्याशी संपर्क साधून ही परिस्थिती सांगितली. वाकळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला. तेथून रुग्णाला घेऊन टेम्पो जिल्हा रुग्णालयात पोहोचला. तेथेही खाट शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. नातेवाईकांनी आमदार जगताप यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दाखल करून घेण्यात आले. मनपा कर्मचारी असलेल्या रुग्णाला दाखल करण्यासाठी ही कसरत सुरू होती.

Read More  एकाच सोसायटीत 70 रुग्ण आढळल्याने खळबळ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या