27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात बसमध्ये महिलेवर अत्याचार

पुण्यात बसमध्ये महिलेवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यात एका २१वर्षीय महिलेचे ट्रॅव्हल्समधून अपहरण करत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. ही महिला नोकरी शोधण्यासाठी बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात राहण्यासाठी ते खोली शोधत होते. यावेळी संबंधित आरोपीने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. त्यानंतर ट्रॅव्हल्स अचानक सुरू करून कात्रज परिसरात घेऊन जात महिलेवर बलात्कार केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पती वॉशरूमला जाताच त्याने हे कृत्य केले आहे.

याप्रकरणी चालक नवनाथ शिवाजी भोंग (वय ३८) याला पोलिसांनी अटक केली आहे. पिडित महिला पतीसोबत पुण्यात आली होती. नोकरीच्या शोधात या दोघांनी पुणे गाठलं होतं. पुण्यात राहण्यासाठी घर शोधत होते. रात्र झाल्यामुळे आरोपी भोंग यांनी या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले.

दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती वॉशरूमला गेले. दरम्यान पती वॉशरूमला गेल्याचे पाहून आरोपीची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला घेवून जात तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुस-यांदा बलात्कार केला.

महिलेचा पती परत आल्यानंतर त्या गाडी न दिसल्याने तो गोंधळला. सगळ्या परिसरात विचारपूस करत होता. मात्र बस व पत्नी न सापडल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. पोलिसांनी तत्काळ तसाप सुरु केला. स्वारगेट आणि कात्रज या दोन्ही परिसरात महिलेवर बलात्कार केला होता. त्यामुळे दोन्ही परिसरातील पोलीस आरोपीच्या शोधात होते अखेर पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या