नाशिक : नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा शहरातील गंगापूर रोडवरील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर हल्ला झाल्याची घटना घडली.
निम्स हॉस्पिटलमध्ये एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडलीे. या वॉर्डबॉयने कात्रीने डॉक्टरच्या शरीरावर सपासप वार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडला.