28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्रसंगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला; २ कर्मचारी जखमी

संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला; २ कर्मचारी जखमी

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : संगमनेरमध्ये नागरिकांची उसळलेली गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. सुमारे शंभर ते दीडशे जणांनी दगडफेक केल्याने पोलिसांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले. गुरुवारी रात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्हे दाखल करून धरपकड सुरू केली आहे. दगडफेकीत दोन पोलिस जखमी झाले आहेत. संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकात ही घटना घडली. पोलिस कर्मचारी सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख यांच्यासह अन्य अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर बहुतांश आरोपी पळून गेले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

चौकात गर्दी जमल्याने ती पांगविण्यासाठी पोलिस गेले. सुरुवातीला त्यांची जमावासोबत बाचाबाची झाली. पोलिसांना जमावातील काही जणांनी धक्काबुक्कीही केली. गर्दीतील अनेकांनी मास्क लावलेले नव्हते. गस्ती पथकातील राज्य राखीव दलाच्या जवानांनी तेथे जमलेली गर्दी हटवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांच्यावर दगडफेकही सुरू केली. पोलिसांचा तंबूही उखडून टाकला. जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला.

भाजपकडून जोरदार टीका
संगमनेरमधील घटनेवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राची मान अपमानाने आणि शरमेने झुकत आहे; तुम्ही मूग गिळून गप्प बसला आहात, कुठे गेली तुमची अस्मिता? असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे. पोलिसांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान मानता ना? मग या महाराष्ट्रात, दररोज महाराष्ट्राचा अपमान होत आहे. संगमनेरमध्ये पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पण अजूनही हल्लेखोर कोण हे पाहून टोपी फिरवली की काय? असा सवाल उपाध्ये यांनी विचारला आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या