20.8 C
Latur
Saturday, October 31, 2020
Home महाराष्ट्र देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बड्या उद्योगांच्या दबावाखाली असून निवडक उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारने शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आणले आहेत. हे कायदे आणून देशात पुन्हा जमीनदारी पद्धत आणण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. हे शेतकरीविरोधी कायदे रद्द होईपर्यंत काँग्रेस पक्ष शेतक-यांसोबत मिळून संघर्ष करत राहील, असा निर्धार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के पाटील यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदावर नियुक्ती झाल्यानंतर एच. के पाटील आज प्रथमच महाराष्ट्र दौ-यावर आले होते. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, गृहराज्य मंत्री सतेज (बंटी) पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर टिळक भवन येथे पत्रकारपरिषदेत बोलताना पाटील यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर सडकून टीका केली.

कोरोनाच्या गंभीर संकटाचा फायदा घेऊन लोकशाही आणि संसदेचे सर्व नियम पाळदळी तुडवत केंद्र सरकारने कृषी विधेयके घाईघाईत संमत करून शेतक-यांची फसवणूक केली आहे. या विधेयकांमुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्या संपल्याने शेतक-यांना खुल्या बाजारात शेतमाल विकावा लागणार आहे. नव्या कायद्यात किमान आधारभूत किमतीचे बंधन नाही. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजकांकडून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात लूट होणार आहे. करार शेतीच्या नावाखाली मोठे उद्योगपती लहान व मध्यम शेतक-यांना संपवतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

काळ्या कायद्याविरोधात राज्यभरात आंदोलन : थोरात
प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी असून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन विधयके संसदेत मंजूर करुन घेतली असून या नवीन काळ्या कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. या काळ््या कायद्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचे सांगितले. तसेच २ ऑक्टोबरला किसान, मजदूर बचाव दिवस पाळला जाणार आहे, असे सांगितले.

दस-याआधी केंद्राचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज?

ताज्या बातम्या

राज्यात १५ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या १५ लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी...

कमलनाथ यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा रद्द!

भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, कॉंग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रचारादरम्यान, भाजपच्या महिला उमेदवारांचा आयटम असा उल्लेख केला...

लातूर जिल्ह्यात ५५ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली असून, शुक्रवार दि़ ३० ऑक्टोबर रोजी ५५ नवे रुग्ण आढळून आले़, तर आज ४ बाधितांचा बळी गेल्याने...

एक हत्या लपविण्यासाठी केल्या ९ हत्या

हैदराबाद : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील मे महिन्यात ९ जणांची हत्या केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका तरुणाला बुधवारी कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. गुन्हेगार संजय कुमार...

झाकीर नाईकने दिला फ्रान्सला इशारा

क्वालांलपूर : मागील काही दिवसांपासून इस्लामिक राष्ट्रांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि फ्रान्स सरकारविरुद्ध निर्दर्शने केली जात आहेत. इस्लाम धर्माबद्दल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे...

बिहारमधील ४१५ उमेदवार कोट्यधीश

पाटणा : सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. गुरूवारी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यादरम्यान, एक महत्त्वाची बाब समोर...

आधार पडताळणीनंतरच निधी मिळणार – वार्षिक ६००० रुपये किसान सन्मान निधी योजना

नवी दिल्ली : जर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक ६००० रुपये घ्यायचे असतील तर आधार व्हेरीफिकेशनसाठी तयार राहा. देशातील काही राज्यांमध्ये...

भारतीय लष्कराने आणले नवे साई चॅट अ‍ॅप

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्स ऍपप्रमाणेच एक नवे ऍप विकसित केले असून, लष्कराने विकसित केलेल्या या ऍपला सिक्युअर ऍप्लिकेशन...

प्रवासी गाड्या एक्सप्रेसमध्ये रुपांतरीत होणार

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता आपल्या कोट्यवधी प्रवाशांना नवीन भेट देण्याची तयारी करत आहे, त्यानंतर लांबचा प्रवास हा अवघ्या काही तासांचा असेल. वास्तविक...

रशियन पोलिसांवर मुस्लिम तरुणाचा हल्ला

मॉस्को : रशियाचील मुस्लिमबहुल भागात आज एकाने ‘अल्ला हो अकबर’ म्हणत एका पोलिसावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यानंतर पोलिसाने हल्लेखोराला गोळ्या घातल्या. या घटनेमुळे...

आणखीन बातम्या

राज्यात १५ लाखांवर रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा रुग्णांची एकूण संख्या १५ लाखांच्यावर गेली आहे. राज्यासाठी ही दिलासा देणारी...

मुलुंड रूग्‍णालय जमिन खरेदीत १२ हजार कोटींचा घोटाळा !

मुंबई,दि.३० (प्रतिनिधी) मुलुंड येथे ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २२ एकर जमीन खरेदी करण्याच्या व्यवहाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट...

दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना थकित वेतन मिळणार! – परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) कोरोनाच्या काळातही प्रवासी वाहतूक सुरू ठेवणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. मात्र परिवहन मंत्री व एसटी...

राज्‍यपालांच्या ‘सल्‍ल्‍या’नुसार राज ठाकरेंचा पवारांना फोन !

मुंबई,दि.३० (प्रतिनिधी) राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘सल्‍ल्‍या’नुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीजदरवाढ प्रश्नी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केला आहे.या प्रकरणी...

एसटी महामंडळ ठेवणार आगारे तारण

मुंबई : एसटी कामगारांचे वेतन आणि अन्य देणी देण्यासाठी एसटी महामंडळाने २ हजार कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे काही आगार, बस...

सोन्या चांदीपेक्षा चोरट्यांकडून कांद्यावर डल्ला

कोल्हापूर : कांद्याचे भाव वाढल्याने आता चोरट्यांनी आपला मोर्चा कांदा चोरीकडे वळवला आहे. कोल्हापुरात तर मार्केट यार्डातील नऊ पोती कांदा चोरट्यांनी रात्री पळवला असून...

आरक्षण प्रश्नी भाजप समाजात आग लावत आहे – सचिन सावंत

पुणे : ‘मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच समाजाचे काही भाजपधार्जिणे नेते मराठा समाजाला भडकविण्याचे काम...

पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

हडपसर: हडपसर हद्दीतील १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल...

तेव्हा शिवसेनेपेक्षा एखाद्या मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील – नीलेश राणे

मुंबई: शिवसेना व खासदार नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांच्यामधील वाद काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. माजी खासदार नीलेश राणे यांनी शुक्रवारी दोन...

राज्‍यपाल नियुक्‍त १२ आमदारांच्या प्रस्‍तावाला मंत्रीमंडळाची मंजुरी !

मुंबई,दि.२९ (प्रतिनिधी) विधानपरिषदेच्या राज्‍यपाल नियुक्‍त १२ जागांसाठी अखेर राज्यसरकारने नावं निश्चित केली आहेत. राज्‍यपालांकडे पाठवण्यात येणाऱ्या नावांच्या प्रस्‍तावाला राज्‍यमंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आल्‍याची माहिती...
1,325FansLike
120FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...