28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंचा फोटो वापरून क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न

आदित्य ठाकरेंचा फोटो वापरून क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

मुंबई : काही दिवसांपूर्वी, आयपीएस अधिका-यांचे नाव आणि फोटोंचा आधार घेत व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करुन पोलिस कर्मचा-यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या फोटोचा वापर करत एका क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी कोळीवाड्यातील रहिवासी कुस्तीपटू दिपेश जांभळे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यांना २३ ऑगस्ट रोजी एक व्हॉट्स ऍपवर मेसेज आला. व्हॉट्स ऍपवर मेसेज करणा-या व्यक्तीने प्रोफाइल फोटो म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो ठेवला होता. या बनावट युजरने तक्रारदार कुस्तीपटू दिपेश जांभळे यांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केली. आपल्याला एका मित्राला तातडीने २५ हजार रुपये ट्रान्सफर करायचे असून नेटबँकिंग काम करत नसल्याचे म्हटले. त्यामुळे तातडीने २५ हजार रुपये पाठवण्याची विनंती हॅकर्स आदित्य ठाकरे असल्याचे भासवून केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या