23.1 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमहाराष्ट्रसंभाजीराजे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न -फडणवीस

संभाजीराजे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न -फडणवीस

एकमत ऑनलाईन

नागपूर : राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे, या शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. संभाजीराजे यांच्या उमेदवारीचा विषय शरद पवार यांनी सुरू केला असे म्हणत त्यांनी संभाजीराजेंच्या कोंडीसाठी शरद पवार यांना जबाबदार धरले आहे.

ज्याप्रकारे सर्वांत आधी शरद पवारांनी हा विषय सुरू केला आणि नंतर ज्या दिशेने हा सर्व विषय गेला… ते पाहून मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा हा सर्व विषय झालेला आहे. मला असं वाटतं की त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. मात्र हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकच जागा आहे. ही जागा निर्वाचित करण्यासाठी आवश्यक नंबर आमच्याकडे आहे. एक जागा निवडून देऊनही काही मते शिल्लक आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यावेळीसुद्धा एकच जागा मिळत होती. मात्र मी मुख्यमंत्र्यांना दोन जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी विनंती केली. तेव्हा मी व फौजिया खान दोघांच्या जागा होत्या.

त्यामुळे शिवसेनेने त्यावेळी माघार घेतली. मात्र पुढच्यावेळी दुसरी जागा ही शिवसेनेला द्यावी ही मागणी त्यांनी केली ती आम्ही मान्य केली. त्यामुळे एक जागा लढवून उर्वरित मतेही शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय कोणालाही देऊ शकत नाही. शिवसेना जे नाव देईल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे शरद पवार यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या