24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रप्रक्षोभक भाषणे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न - जयंत पाटलांचा आरोप

प्रक्षोभक भाषणे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न – जयंत पाटलांचा आरोप

एकमत ऑनलाईन

पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. एसटी कर्मचा-यांना भडकावल्याच्या ठपका ठेवत कर्मचा-यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. यावर पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सोमवारी रायगड जिल्हा दौरा करणार असून पुणे शहर आणि कार्यकारीणीची बैठक होणार आहे. त्यांचा सातारा, सांगली, आणि कोल्हापूर दौरा असून कोल्हापूरला २३ तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत परिवार संवादाच्या कार्यक्रमाचा आढावा तसेच समारोपाचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील योग्य ती माहिती घेवून कारवाई करतील. तपास कोणत्या दिशेला जात आहे या संदर्भात मला कोणतीही माहिती नसल्याचे ते म्हणाले. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्रातून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हे सर्व घडवण्यासाठी मागे कोण होते याचा शोध घेणे गरजेचे आहे. या आंदोलनाला खतपाणी कोणी घातले, यामध्ये प्रक्षोभक भाषणे कोणी केली, न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते, आंदोलन करण्यासाठी भाग पाडणारी लोके कोण होती याचा शोध घेण्याची आवश्यकता सगळ्यांनी व्यक्त केली आहे. गृहमंत्री यावर नक्कीच कारवाई करतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या